घरात नेटवर्क चा प्रोब्लेम तर हे डिव्हाइस येईल कामी | network problem

 मोबाइलला नेटवर्क येत नाही? इंस्टॉल करा ‘हे’ खास डिव्हाइस, मिळेल जबरदस्त कनेक्टिव्हिटी

omyablog.blogspot.com


सध्या टेलिकॉम कंपन्यांकडून ४जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध केली जात आहे. तसेच, लवकरच ५जी कनेक्टिव्हिटी उपलब्ध केली जाणार आहे. मात्र, असे असतानाही अनेकदा स्मार्टफोनमध्ये नेटवर्कच नसल्याची समस्या जाणवत असते. घरात नेटवर्कची समस्या बऱ्याच वेळा जाणवते. ग्रामीण भागात तर ही समस्या २जी, ३जी नेटवर्कला देखील जाणवते.







मोबाइल सिग्नल बूस्टरचा होईल उपयोग



तुम्हाला जर घरात स्मार्टफोनवर सिग्नल नसल्याची समस्या येत असल्यास बाजारातून मोबाइल सिग्नल बूस्टर खरेदी करू शकता. हे डिव्हाइस मोबाइल सिग्नलला त्वरित वाढवते. हे डिव्हाइस घरात लावून तुम्ही सहज स्मार्टफोन वापरू शकता. यामुळे कनेक्टिव्हिटी देखील मिळेल व तुम्हाला कॉल करतानाही कोणतीही समस्या येणार नाही. तसेच, इंटरनेट देखील हाय-स्पीडमध्ये वापरू शकता. हे एक लहान डिव्हाइस असते, जे अगदी वाय-फाय राउटरप्रमाणे दिसते. या डिव्हाइसला इंस्टॉल केल्यास तुम्हाला नेटवर्कची समस्या येणार नाही.



कुठे मिळेल हे डिव्हाइस ?


 तुम्ही ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवरून देखील हे डिव्हाइस खरेदी करू शकता. तुम्हाला केवळ घरात इंस्टॉल करायचे आहे. मात्र, लक्षात ठेवा की नेटवर्कसाठी तुम्हाला हे डिव्हाइस सतत चालू ठेवावे लागेल व यासाठी वीजेची गरज लागते. लाइट गेल्यास मोबाइल नेटवर्कची समस्या येऊ शकते. अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर देखील बूस्टर स्वस्तात उपलब्ध आहे.




Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post