"आत्महत्या " | एक जीवन हजारो दुख (SUICIDE)

 आत्महत्या 



omyablog.blogspot.com


जीवनात आत्महत्या करण  हाच एक पर्याय असतो का ?




आयुष्यात खुप दुःख आहेत, ते दुःख खुप वेदना देत असतात, त्या दुःखांना सहन करण अशक्य वाटत. अस वाटत कि, हे जग आपल्यासाठी बनलच नाही, आपला जगुन काही फायदाच नाही, जीव देण हा एकच मार्ग दिसायला लागतो,

 

 

आणि मग एक वेळ निश्चीत केल्या जाते, शेवटच एक पत्र लिहील्या जात....

 

मग जणावराप्रमाणे गळ्यामध्ये दोरी अडकवल्या जाते, पायाने जमीन सोडल्या जाते मग पाण्याबाहेर पडलेल्या माश्या प्रमाणे   जीव 4-5 मिनीटे तडफडत तडफडत सोडल्या जातो.

 

मग दुसऱ्या दिवशी मुलीचा / मुलाचा  फोटो पेपरमध्ये बघुन बाप पेपर घेऊन घरी धावत येतो, पण बाप अडाणी असल्यामुळे तो शेजाऱ्यांकडून बातमी वाचून घेतो.

बातमी ऐकताच त्याच्या पाया खालुन जमीन सरकते. "महाविद्यालयातील मुलीची गळफास घेऊन आत्महत्या" 

अस त्यामध्ये लिहीलेल असत.

 

मग. बाप रडतो, आई रडते, "हे होणं शक्यच नाही" अस म्हणत अश्रूंची धार थांबत नाही. काही वेळानंतर घराबाहेर रुग्णवाहिका येते, पोलिस केस झालेली असल्यामुळ चिरफाड करूण प्रेत घरी आणल्या जात. आई वडील त्या प्रेताला वारंवार  विचारतात, "तु अस का केल, का केल ?" पण त्यावेळी,

 

उत्तर देण्यासाठी ती मुलगी / मुलगा  नसते, असते तर फक्त शेवटच पत्र...

एवढं मोठ पाऊल घेण सोप वाटतं, पण काही प्रश्न हे पाऊल घेण्या अगोदर  स्वतः ला नक्की विचारा?

 ठिक आहे, मी मानतो, आयुष्यात दुःख आहे, किंवा कोणितरी तुमच हृदय तोडलं, तुम्हाला धोका दिला, तुमच्या

 (Feelings hurt) भावना दुखावल्यात, पण तुम्हाला जन्म देताना तुमच्या

आईने ज्या कळा सोसल्या असतील त्या कळांपेक्षाही जास्त महत्वाच्या तुमच्या भावना आहेत का ?

तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी तुमच्या आईवडिलांनी सहन केलेल्या हालअपेष्टा तुमच्या दुःखापेक्षा जास्त आहे का?

तुम्हाला कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये म्हणुन तुमच्या आईवडिलांनी केलेल्या कष्टांपेक्षा जास्त तुमचे 

दुःख आहे का ?



तुमचे सारे हट्ट पुरवलेल्या आई वडिलांपेक्षा जास्त तुमचे दुःख आहे का ?

तुम्हाला साऱ्या गोष्टी शिकवणाऱ्या आईपेक्षा आणि कष्ट करूण तुमची फी भरणाऱ्या वडिलांपेक्षाही तुमचे दुःखा जास्त आहे का ?

 तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट करणाऱ्या आई-वडिलांपेक्षाही तुमचे दु:ख जास्त आहे का ?

 

आणि आत्महत्या केल्यानंतर जेव्हा तुमच्या आईवडीलांची परिस्थीती वर सांगीतल्याप्रमाणे होईल, तेव्हा त्यांचे डोळे पुसण्यासाठी किंवा त्यांचे दुःख दूर करण्यासाठी तुम्ही पुन्हा येऊ शकाल का?

 

माझ्या मते वरिल बऱ्याच प्रश्नांची उत्तरे नकारात्मकच असतील, खरं आहे ना |


पण जरी वाटत असेल आत्महत्या कराव, तर तुम्हाला लाज कशी वाटत नाही, स्वतःच्या आईवडीलांच्या

 स्वप्नांचा, कष्टांचा, हालअपेष्टेचाशिकवणीचा गळा दाबताना. का कापत नाहीत तुमचे हात

 

का थांबत नाही तुमचे हात गळफास घेताना, जेव्हा आठवतात तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे कष्ट. वाटूद्या  मनाला थोडी लाज.

बर दुःख कोणाच्या आयुष्यात नसत, प्रत्येकजणाने आयुष्य दुःखाच्या वाटेवरच चालुन काढलेल असत. तुमच्या आईवडिलांनी सुद्धा कधी ना कधी दु:ख बघितलच असेल ना, मग जर त्यांनी सुद्धा आत्महत्या केली असती तर

तुम्हाला हे आयुष्य भेटू शकल असत का?

पण त्यांनी त्या दु:खांचा सामना केला असेलच ना ?



१६०० दरम्यान जेव्हा आग्रामध्ये त्यांना कैद करून ठेवण्यात आल होत, त्यावेळेस सुद्धा त्यांनी जर असच आत्महत्या केली असती तर काय आपल्याला स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज लाभले असते का?

 

ज्या वेळेस त्यांनी ठरवल होत की दलितांना आणि स्त्रीयांना शिक्षण द्यायचं तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना वाळीत टाकल होत, तेव्हा हे दुःख पाहून जर त्यांनी आत्महत्या केली असती तर आपल्याला महात्मा ज्योतीबा फुले आणि स्त्रीयांची पहिली शिक्षीका सावित्री बाई फूले लाभले असते का ?


र्गामध्ये बसुन त्यांना कधी शिकू दिल नाही, म्हणुन वर्गाबाहेर बसुन त्यांना शिकावं लागल, अस्पृश्य, दलित, महार म्हणुन ज्या व्यक्तीला हिनवल गेल. ज्यांना राहण्यासाठी भाड्याने घर नाही दिल, पाणी पिण्याचा अधिकार नाही दिला, मंदिरात प्रवेश करू नाही दिला. अश्या व्यक्तीने जर त्यावेळेस एवढ दुःख बघून आत्महत्या केली असती तर आज आपल्याला भारतीय संविधान आणि त्या भारतीय संविधानाचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लाभले असते का ?

 

“मुस्लीम मुलींना शिक्षणाचे हक्क नाहीत" अस सांगणाऱ्या तालीबान  या आतंकवादी संघटनेच्या विरोधात जाऊन पाकीस्तानमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी पुढे आलेली एक मुलगी, जिच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती तिचा ईलाज झाल्यानंतर सुद्धा तीने माघार न घेता, पुढे आली आणि स्त्रीशिक्षणासाठी झटत राहिली,



अशी मुलगी जीच नाव घेतांना मलासुद्धा अभिमान वाटतोय, जिने जगाला सर्वात कमी वयात शांततेचा नोबेल पुरस्कार दिला, अशी मलाला युसुफ झाई. इने माघार घेतल असत तर अशी प्रेरणादाई मुलगी  जगाला भेटली असती का?

 

जेवढे दुःख तुमच्या आयुष्यात असतील ना, त्यापेक्षा कीतीतरीपट जास्त दुःख अशा महान व्यक्तींच्या आयुष्यात असतील, पण त्यांनी त्या दु:खांना आणि समस्यांचा  सामना केला. 

 

कधी जर आत्महत्या करण्याचा विचार मनात आलाच तर वरचे काही प्रश्न आणि प्रसंग नकीच आठवा. आणि जे काही दुःखा वेगेरे तुमच्या आयुष्यात असतील ते काही आयुष्यभर रहाणार नाही ते आज ना उद्या नक्कीच निघुण जातील, पण ते दुःख संपवण्यासाठी


आत्महत्या कराल तर तुम्ही नक्की त्या दुःखातून मुक्त व्हाल, पण मग तो डाग तुमच्या आईवडिलांच्या माथी लागलेला असेल, तो डाग कधी आयुष्यभर मिटणार नाही, त्यामुळ जन्म देणाऱ्याच्या माथी हा धब्बा मारायचा  तरी कशाला? याचा विचार तुम्ही नक्की करा.

 

धन्यवाद ।

 

(अभिजीत जावळे)

जर जीवनामध्ये काही अडचणींचा सामना करायला मदत हवी असेल किवा स्वतःला एकटा वाटत असेल सरकार कडून एक website दिली आहे नक्कीच भेट द्या 



आणि जास्तीत जास्त मित्रांना किवा मैत्रीणीना पाठवा एक पोस्ट जर त्यांना मदत होत असेल तर






stop Suicide


Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post