A Real Love Story | Omraj Waghmare




Omyablog.blogspot.com




 प्रेम ही निसर्गाने मानवाला दिलेली सर्वात मौल्यवान देणगी आहे. प्रेम हा एक अनुभव आहे, जो प्रत्येकाच्या मनात समान आणि एकत्र असेलच असे नाही. पण जर तुमचं कुणावर प्रेम असेल, कुणाच्या सुखासाठी तुम्ही काहीही करायला तयार असाल, तर तुम्ही प्रेमात आहात. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला व्यक्त करायची गरज नाही. जर तुमचं कुणावर प्रेम असेल तर ते प्रेम तुमच्या डोळ्यातच दिसतं. जेव्हा आपण एखाद्याच्या प्रेमात असतो तेव्हा तो क्षण आपल्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि अविस्मरणीय क्षण असतो. जे आपण मरेपर्यंत विसरू शकत नाही. अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की प्रेम म्हणजे काय?



तर हि स्टोरी आहे २०१९ ची जेव्हा ती माझ्या जीवनामध्ये आली होती.(आहे.) 

अस म्हणतात प्रेमाची सुरुवात हि भांडणापासून होते असच काही तरी  आमच्या बाबती मध्ये हि झाल होत.

कोणतही कारण नसताना मुद्दामुनच ती मला भांडत रहायची  एक दिवस मी आजारी काय पडलो ती भांडण 

न करता माझी लहान बाळासारखी काळजी करायला लागली, सेकंदा सेकंदा ला येऊन डोक्यावरून/केसांवरून हात फिरवत होती. 

आणि हे सगळं करताना काय झालं कस झालं काही कळालंच नाही. त्या वेडी ने हळूच माझ्या हाता मध्ये प्रेमाची चिठी थरथरत्या हाताने दिली. 

मी ती चिठी न वाचता तशीच खाली ठेवली कारण मला काहीच सुचत न्हवत काय म्हणू आणि काय सांगू 

माझे तर पूर्ण लाईट्स लागल्या, ती थोड्या वेळाने येऊन अस तब्येत कशी आहे अशी विचारात होती जस काय थोड्या वेळा खाली काही झालंच नाही 

आणि मग काही वेळेने मला पुन्हा विचारत विचारायला लागली काही सांगणं म्हणून मी तर पूर्ण हँग 

 मग दुसऱ्या दिवशी अशीच माझ्या जवळ येऊन बसली आणि काळजी करत  माझ्या कपाळावर हात ठेऊन बसली. 

आणि न कळत आमची एक छोटीशी मिठी झाली, आणि इथून आमच्या प्रेमाची खरी सुरुवात झाली. 

मग काय आता सुरु लपून छपून एकमेकांना बघणं वेड्यांसारखं इशारे करून हसणं पण बर वाटायचं 

कधी कधी मी काही काम निमित्त बाहेर जर गेलो ना तर ती वेडी बाहेर बालकनी(गॅल्लरी)

मध्ये येऊन मुद्दाम झोपायची मी येईल म्हणून. 

मजेशीर म्हणजे मी आलो ना तर एकदम लहान बाळांसारखी ती रुसून बसायची मग माझं सुरु तिला मुद्दामून चिडवणं तिला मनवण 

मग ती लगेच राग सोडून मला मिठीत घ्यायची. 

आणि खरं म्हणलं तर माझही कुठं मन व्हायचं नाही तिला सोडून जायचं पण काय करणार मुलगा म्हणलं तर काही जाबदाऱ्या पण असतात ना त्यामुळं 

पण खूप मज्या यायची सगळे घरात असताना तिला लपून बघून स्माईल द्यायला. 

जेव्हा  ती कंपनी मध्ये कामाला जायची त्यावेळेला अजिबात जीव लागायचा नाही पूर्ण दिवस फक्त ती आणि तिच्या आठवणी माझ्या डोळ्यांसमोर राहाच्या 

सकाळी लवकर उठायचं तिला बघण्यासाठी तिला मिठीत घेण्यासाठी कारण तेवढाच एक वेळ होता आमच्या कडे मग डायरेक्ट संध्याकाळी कंपनीतुन येई पर्यन्त मी तिची वाट बघत बसायचो कधी थोडासा उशीर झाला यायला तिला तर पूर्ण जीव निघून जायचा पण तिला येताना पाहिलं कि सगळं मन शांत होऊन जायचं   


आमची लव्ह स्टोरी पण काही बॉलीवूड पिक्चर पेक्ष्या कमी न्हवती कारण जश्या ट्वीस्ट  येतात पिक्चर मध्ये तशेच आता हळू हळू आमच्या लाइफ मध्ये पण येउ लागले. भेटणं बोलणं हळूहळू आम्हाला कठीण होत चाललं होत कारण घरच्यांना कळत न कळत काही गोष्टी समजू लागल्या

तरीहि आमचं प्रेम काही कमी होत न्हवत जेवढं प्रॉब्लेम्स तेवढं जास्त प्रेम 

आणि तोही एक दिवस आलाच जेव्हा मॅटर वाढला तिला आणि मला दोघांना वॉर्निंग मिळाल्या असं वाटलं आता सगळं संपलं काहीच सूचनास झालं 

पूर्ण जीव वेडापिसा झाला आणि काही दिवसांनी ते तिथून निघून दुसरी कडे राहायला गेले आता तर एवढं अवघड झालं होत कि बस ना भेटणं ना जास्त बोलणं  जेव्हा  ती पागल कंपनी मध्ये कामाला जायची त्यावेळेला अजिबात जीव लागायचा नाही पूर्ण दिवस फक्त ती आणि तिच्या आठवणी माझ्या डोळ्यांसमोर राहाच्या  

झाल  ती कंपनी मध्ये  मी तिच्या आठवणी मध्ये आणि ती माझ्या आठवणी मध्ये त्यामुळं 

हेही व्हायला लागलं जे प्रत्येक नात्यानं मध्ये होतात गैरसमज हा एक असा शब्द आहे या शब्दाने पूर्ण नाती उद्ध्वस्त करण्याची ताकत या  मध्ये असते, एवढा गैरसमज वाढला कि बस असं वाटलं सगळं संपलं  पूर्ण फुलस्टॉप लागला. 

ती कंपनी मधून अली आणि तेवढ्यात तिने कॉल केला सॉरी म्हणून शांत होऊन गेली आणि मी तिच्या फोन ची वाटच बघत होतो. 

आणि मग त्या वेडी ने एक कॅडबरी दिली  



आणि पुन्हा आम्ही एक झालो. 

असा कधीच विचार केला नाही कि,काही दिवस सोबत राहील आणि काही दिवसांनी तिला सोडून जाईल 

दिवसेंदिवस आमचं प्रेम वाढत होत.




                                                                                                      to be continue in next post...............

Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post