व्यवसायासाठी कर्ज मिळणार 1 लाख रुपय | Vjnt Loan

तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे का तर सरकार खास obc/ebc साठी 

1 लाख पर्यंत कर्ज उपलब्ध करून देत आहे 

अधिक माहिती साठी  माहिती सविस्तर वाचा 




योजनेचे उद्देश :-

 १.विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांची आर्थिक उन्नती करणे


२. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील घटकांच्या हिताच्या दृष्टीकोनातून त्यांना स्वयंरोजगारास प्रोत्साहित करणे,


३. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील व्यक्तींना आर्थिकदृष्टया सक्षम करणे,


४. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दुर्बल घटकाच्या व्यक्तींना व्यवसाय करण्याकरीता तात्काळ वित्त पुरवठा करणे,


५. सदर योजनांसाठी लघु व्यवसाय उदा. मत्स्य व्यवसाय, कृषी क्लिनिक, पॉवर टिलर,हार्डवेअर व पेंट शॉप, सायबर कॅफे, संगणक प्रशिक्षण, झेरॉक्स, स्टेशनरी, सलुन, ब्युटी पार्लर, मसाला उद्योग, पापड उद्योग, मसाला मिर्ची कांडप उद्योग, वडापाव विक्री केंद्र, भाजी विक्री केंद्र, ऑटोरिक्षा, चहा विक्री केंद्र, सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र, डी. टी. पी. वर्क, स्विट मार्ट, ड्राय क्लिनिंग सेंटर, हॉटेल, टायपिंग इन्स्टीटयुट, ऑटो रिपेअरींग वर्कशॉप, मोबाईल रिपेअरिंग, गॅरेज, फ्रिज दुरूस्ती, ए. सी. दुरुस्ती, चिकन/मटन शॉप, इलेक्ट्रिकल शॉप, आईस्क्रिम पार्लर व इतर.


६. मासळी विक्री, भाजीपाला विक्री, फळ विक्री, किराणा दुकान, आठवडी बाजारामध्ये छोटसे दुकान, टेलिफोन बुथ किंवा अन्य तांत्रिक लघु उद्योग अशा लघु व्यवसायासाठी ही योजना सुरू करणे,


७. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील निराधार, विधवा महिला इ.लाभार्थीना तात्काळ / प्राथम्याने लाभ देणे.


लाभार्थी निवडीची पात्रता 



१. अर्जदार विमुक्त जाती/ भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्गातील असावा,


२. अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा,


३. अर्जदाराचे वय १८ ते ५५ वर्षे असावे,


४. अर्जदाराचे एकत्रित कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रू. १.०० लाखापेक्षा जास्त नसावे.(सक्षम प्राधिका-याने दिलेल्या उत्पन्न प्रमाणपत्रानुसार)


५. एका वेळी कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल,


६. शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत तसेच शासकीय/निमशासकीय संस्थांमधून तांत्रिक प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभवी तरूण मुले/मुली यांना प्राधान्य देण्यात येईल.

७. अर्जदाराने आधार कार्ड संलग्न बँक खात्याचा तपशिल सादर करावा,


८. अर्जदार महामंडळाच्या कोणत्याही (केंद्र व राज्य) योजनेचा थकबाकीदार नसावा.


योजनचे स्वरूप :

वसंतराव नाईक विमुक्त  जाती व भटक्या  जमाती विकास  महामंडळामार्फत  राबवण्याचा  प्रस्थावित  थेट  कर्ज  योजनच स्वरूप  खालीलप्रमाणे  -

प्रकल्प  --- रू. १,००,०००/- पयंत

व्याजदर -- निंयामित कर्ज  परत  फेड करणाऱ्या  लाभाथींना  व्याज आकारण्यात येणार नाही 



नियमित  ४८ समान मासिक  हप्त्यामधून   मुद्दल 

रू. २,०८५/- परत फेड  करावी लागेल \

निंयामित कर्जाची परत फेड न करणाऱ्यास

 नियमित  कर्जाची  परत  फेड न करणाऱ्या  लाभाथींना  जेवढे   कर्जाचे  हप्‍ त थकीत होतील,  तेवड्या रकमे वर द.सा.द.न . ४% व्याज आकारण्यात येईल. 


पहिला हप्ता : ७५००० रु 

दुसरा हप्ता:   उद्योग सुरु  झाल्या 3 महिन्यानंतर २५००० scheme




सविस्तर माहिती साठी pdf  वाचून घ्या 

click here 






Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post