तुमच्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये टाकण्या अगोदर हे नक्कीच वाचा ?

 तुमच्या मुलांना इंग्रजी शाळांमध्ये दाखल करण्या अगोदर हे नक्कीच वाचा ?




काल मी माझ्या शेजारी होणारी घटना पाहिली एक वडील  त्याच्या मुलाला मारत होता. कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 



तो मुलगा पाचवी मध्ये शिकत आहे.त्याच्या वडिलांनी त्याला आजची तारीख विचारली त्यावर त्या मुलाने इंग्लिश मध्ये Twenty First October असे उत्तर दिले, वार विचारल्यावर त्याने  Sunday असे सांगितल. वडील  अडाणी होते म्हणून त्यांना हे काही कळालेच नाही. 


वडिलांनी त्याला मराठी मध्ये तारीख सांगण्यास सांगितले मात्र त्या मुलाला हे जमले नाही. त्या मुलाचे शिक्षण इंग्रजी माध्यमामध्ये झाले होत.


त्यामुळ त्याला मराठी मध्ये सांगता आलं नाही. एवढ्या गोष्टीसाठी वडिलांनी त्याच्या वर फटक्याचा वर्षाव सुरु केला.



कारण तुम्हाला छोट वाटेल. परंतु यामागे खूप साऱ्या गोष्टींचा खुलासा होईल. त्यामुळे  हा लेख शेवट पर्यंत नक्कीच वाचा.



(त्या मुलाचे नाव अभय असे ग्राह्य धरू  )




अभय ला  मी चांगलेच ओळखत होतो,

अभय ला sunday, monday ; one, two, three, four हे चांगल्या प्रकारे येत होत. परंतु त्याला रविवार, सोमवार; एक, दोन,तीन, चार असे येत नव्हत,  


अभय पहिली पासून इंग्रजी माध्यमा मधून शिकला आहे.  लहानपणापासुन इंग्रजी मध्ये शिकलेला असल्यामुळे त्याला मराठी वाचता आणि समजता येत नव्हत.



लहानपणापासून त्याला इंग्रजी मधूनच प्रत्येक गोष्ट रटवल्या गेली होती. पण त्याचा फायदा अभय ला दैनंदिन जीवनामध्ये होणार नाही याचा विचार शिक्षकांनी केलेलेला नव्हता.



आता या घटनेला बघून दोष कोणाला द्यावा हे कळत नाही. 



दोष मुलाला द्यावा ?

कारण मराठीत त्याने मुलभूत शिक्षण घेतलेले नाही.


वडिलांना दोष द्यावा ?

कारण  फक्त भूषाण म्हणून अभयला इंग्रजी माध्यमामध्ये टाकल 



कि मग शिक्षकांना दोष द्यावा ?

कारण त्यानी  मुलाच्या व्यक्तिमत्व विकासाचा कधी विचार केला नाही, प्रत्येक गोष्ट फक्त इंग्रजी मध्ये रटवल्या गेली. 



या मध्ये दोष पालकांचा, कारण मी बऱ्याचदा बघितल की, पालक फक्त भूषान म्हणून मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये शिकायला टाकतात, परंतु आपण भूषानासाठी मुलाचं भविष्य वाया घालवत आहोत. याचा विचार आपण करत नाही.



माझ्या मते जर आपण बघितल तर मुलांना 10 वी पर्यंत मातृभाषेमध्ये शिक्षण द्यायला हवे, ज्यामूळ मुल रट्टा मारण्या पेक्षा शिक्षणामध्ये जास्त रुची घेतील. वरून त्यांचा व्यक्तीमत्व विकास देखील होईल.




आणि गोष्ट राहिली इंग्रजी भाषेची तर मराठी मध्यमातील शाळांमध्ये देखील इंग्रजीची तासीका होतेच. त्याच बरोबर इंग्रजी भाषेचे क्लास देखील लावल्या जाऊ शकतात. त्याचा खर्च सुद्धा काही जास्त नसतो आणि एवढ तर आपण आपल्या मुलांसाठी करूच शकतो.






आपल्या मुलाचं भविष्य आपल्या हातात आहे,  त्यामुळ फक्त भूषाणासाठी त्यांना इंग्रजी शाळांमध्ये टाकण्याचा मूर्खपणा करू नये.




मोहन भागवत देखील या गोष्टीच समर्थन करतात.




https://www.indiatoday.in/education-today/news/story/mother-tongue-medium-of-learning-274768-2015-11-28

Must Read It 👆👆



शेवटी आपल्या मुलांना आपल्याला यंत्र मानव [robot] बनवायचं कि मग चांगली व्यक्ती याचा विचार नक्कीच करा,


आणि हो तुमच्या मुलाला मराठी वाचता, लिहिता येत का  हे नक्की तपासा 




धन्यवाद 

                                                    (अभिजीत जावळे)


                                                                          

                                                                      

   

                

Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post