Health id card Benifits | हेंल्थ आयडी कार्ड चे फायदे

 Health id card Benifits | हेंल्थ आयडी कार्ड चे फायदे 



health id card 



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी आरोग्यासंदर्भात नॅशनल डिजीटल हेल्थ मिशन या नव्या योजनेची घोषणा केली. या योजनेचे उद्घाटन केल्यानंतर आणखी एका मोठ्या योजनेबद्दल त्यांनी माहिती दिली.




डिजिटल आरोग्य ओळखपत्र


  1. आधार कार्डप्रमाणेच हे एक यूनिक कार्ड असेल, जे तुमच्या आरोग्याशीसंबंधित माहितीची नोंदणी करेल.
  2. हे कार्ड तुमच्या खासगी माहितीच्या आधारावर बनवले जाईल.
  3. आधार कार्ड अथवा मोबाइल नंबरचा वापर करून हे ओळखपत्र तयार केले जाईल.
  4. हे ओखळपत्र आरोग्याशीसंबंधित माहितीसाठी एक आयडेंटिफायर म्हणून काम करेल.
  5. तसेच, सिस्टम डेमोग्राफिक आणि लोकेशन, कुटुंबासह इतर महत्त्वाची माहिती जमा करेल.
  6. नागरिकांच्या परवानगीनंतरच ही माहिती ओखळपत्राशी जोडली जाईल.
  7. NDHM च्या वेबसाइटनुसार, पर्सनल हेल्थ रेकॉर्ड सिस्टमद्वारे व्यक्तीला आपल्या आरोग्याशी संबंधित माहिती मॅनेज करता येईल.
  8. याच्या माध्यमातून आरोग्य सेवा डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्याचा उद्देश आहे.
  9. एक इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड तयार केला जाईल. यात रुग्णाच्या वैद्यकीय व उपचाराबाबत संपूर्ण माहिती असेल.





ओळखकार्डामध्ये व्यक्तीची आरोग्यविषयक सर्व माहिती असते. त्या व्यक्तीला कोणता आजार आहे का, कोणती औषधे तो घेत आहे किंवा पूर्वी कोणता आजार (Medical History) होऊन गेला आहे याबाबत सर्व माहिती असते. यामुळे आपत्कालीन स्थितीत एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात


 दाखल केल्यास त्याचा आरोग्य कार्ड ओळख क्रमांक टाकताच त्याची सर्व आरोग्य विषयक माहिती मिळेल आणि उपचार करणं सोपं जाईल. हा आरोग्यकार्ड ओळखक्रमांक तयार करण्यासाठी कोणत्याही कागदपत्रांची गरज भासणार नाही.

 केवळ आधारकार्ड क्रमांक आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. त्यांना जोडून हा नवीन आरोग्य ओळख क्रमांक निर्माण केला जाईल. प्रथम आरोग्य कार्ड तयार केलं जाईल; मात्र त्याबाबत लोकांच्या मनात अनेक संशय असल्यानं नागरिकांची आरोग्य विषयक माहिती त्यांच्या संमतीनं घातली जाईल.

Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post