कोर्स एक अन् Job च्या संधी अनेक! 'हा' कोर्स शिकणं काळाची गरज आहे, कसा घ्याल प्रवेश?

 





आज सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत आहे. यामुळे माहितीची साठवणूकदेखील मोठ्या प्रमाणात होत आहे. सहाजिकच डेटाचे महत्व अधिकवाढले आहे. 

एकीकडे या आधुनिक पद्धतीमुळे जरी काही गोष्टी सोप्या होत असल्या तरी धोकादेखील तितकाच वाढला आहे. सायबर हल्ले, हॅकर्सकडून माहितीची होणारी चोरी, यामुळे नुकसानही होत आहे. हे टेक्नॉलॉजिकल डिस्ट्रप्शन्स रोखण्यासाठी सायबर तज्ज्ञांची गरज आहे. हीच गरज लक्षात घेता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित केटीएचएम महाविद्यालयाने


(KTHM College Nashik) 'बीएससी सायबर अँड डिजिटल सायन्स' याकोर्सचे (B.Sc Cyber and Digital Science course in nashik) प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. चला तर मग या कोर्सबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया...


बीएससी सायबर अँड डिजिटल सायन्स' या कोर्ससाठी उच्च माध्यमिक शालांत परिक्षा बारावी, 3 वर्षाचा डिप्लोमा किंवा एमसीव्हीसी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मेरीट फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना या कोर्ससाठी प्रवेश घ्यायचा आहे.



 त्यांनी kthmcollege.ac.inया वेबसाईटला भेट देऊन हा फाॅर्म भरायचा आहे. त्यानंतर मेरीट लिस्ट लागल्यानंतर पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू होईल. त्या संदर्भात अधिक माहिती महाविद्यायाकडून दिली जाईल. कोर्सच्या चौकशीसाठी 9673364999  या मोबाईल क्रमांकावर विद्यार्थी संपर्क साधू शकता. तसेच अधिक माहितीसाठी गंगापूर रोड, मॅरेथॉन चौक, के.टी.एच.एम महाविद्यालय नाशिक येथे भेट देऊ शकता.


या कोर्ससाठी फीस किती असेल?

या कोर्सची फी 35 हजार रुपये आहे, ही फी 1 वर्षासाठी आहे. या कोर्समधील एकूण जागांमध्ये 53 टक्के रिझर्व्हेशन आहे. त्यात अनुसूचित जाती जमातींसाठी 50 टक्के तर, खेळाडू, दिव्यांग यांच्यासाठी 3 टक्के आरक्षित आहे. अनुसूचित जाती जमातींमध्ये SC, ST, NT, OBC, EWS यांचा समावेश आहे. मात्र एकूण आरक्षित जागेवरील विद्यार्थ्यांसाठी किती फी असणार आहे,



शिक्षण घेतल्यानंतर जॉबच्या संधी कुठे?

या अभ्यासक्रमानंतर रोजगाराच्या, व्यावसायाच्या अनेक संधी उपलबध आहेत. शासकीय संस्थांमध्येही मोठे मनुष्यबळ लागणार आहे. चीफ इन्फर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर, 

आयटी डायरेक्टर, आयटी सिक्युरिटी डायरेक्टर, आयटी मॅनेजर, आयटी सिक्युरिटी मॅनेजर, सिक्युरिटी आर्किटेक्ट/इंजिनिअर, सिक्युरिटी स्पेशालिस्ट, सिक्युरिटी कन्सल्टंट/सल्लागार, सुरक्षा विश्लेषक, सुरक्षा अधिकारी, सुरक्षा प्रशासक, अप्लिकेशन डेव्हलपर अशा विविध पदांचे रोजगार उपलब्ध होणार आहेत.

 तसेच  बीएस्सी सायबर अ‍ॅन्ड डिजिटल सायन्सच्या विद्यार्थ्याला सुरक्षा प्रणालीमध्ये, सुरक्षा प्रशासनामध्ये, रिस्क असेसमेंट, अनॅलिसिस अ‍ॅन्ड मॅनेजमेंट, गव्हर्नन्स, क्लाऊट कंप्युटिंग सिक्युरिटी, थ्रेट इंटेलिजन्स, पेनेट्रेशन टेस्टिंग, इंट्रुजन डिटेक्शन, नेटवर्क मॉनिटरिंग, फॉरेन्सिक आदी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.


Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post