जय भिम ' हा नारा कुणी दिला? |आणि कधी पासून देण्यात आला.

'जय भिम' हा नारा कुणी दिला? | आणि  कधी पासून देण्यात आला.





सूर्या या सुपरस्टारच्या चित्रपटातून एका आदिवासी दलित महिलेचा न्यायासाठीचा संघर्ष चितरण्यात आला आहे.



'जय भीम' या शब्दावर हजारो नव्हे तर लाखो गाणी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात गायली जातात. तामिळनाडूत पण या एका शब्दाने सध्या वेड लावलं आहे.



हा शब्द अभिवादनापासून क्रांतीचे प्रतीक कसा झाला याचा प्रवास देखील रंजक आहे. 'जय भीम' हा शब्द केव्हा रूढ झाला आणि महाराष्ट्रात तयार झालेला हा शब्द भारतभर कसा पसरला हे शोधण्याचा प्रयत्न या लेखातून करण्यात आला आहे.


जय भिम  नारा कुणी दिला?


जय भिम 'चा नारा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबू हरदास एल. एन. (लक्ष्मण नगराळे) यांनी 1935 मध्ये दिला अशी नोंद आहे.


बाबू हरदास यांनीच 'जय भिम 'चा नारा दिल्याची नोंद रामचंद्र क्षीरसागर यांच्या दलित मूव्हमेंट इन इंडिया अँड इट्स लीडर्स या पुस्तकात आहे.



या दलातील स्वयंसेवकांना त्यांनी सांगितले होते की एकमेकांना अभिवादन करताना नमस्कार, रामराम, किंवा जोहार मायबाप न म्हणता 'जय भीम' असे म्हणावे. आणि 'जय भीम'ला प्रत्युत्तर म्हणून 'जय भिम' म्हणावे."




1938 साली औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात मक्रणपूर येथे भाऊसाहेब मोरे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी एक सभा भरवली होती. या सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील उपस्थित होते. त्या सभेत मोरे यांनी जनतेला सांगितले की यापुढे आपण एकमेकांना अभिवादन करताना 'जय भिम'च म्हणत जाऊ."


ते सांगतात, "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात दलित उद्धारासाठी जे आंदोलन सुरू केले त्यात अनेक तरुण स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. त्यापैकी एक बाबू हरदास एल. एन. होते."



1925 साली त्यांनी बिडी मजुरांची संघटना स्थापन केली. विदर्भातील दलित आणि आदिवासी समाजातील लोक तेंदू पत्ते गोळा करत, बिडी कारखान्यांमध्ये काम करत तसेच घरोघरी बिडी वळण्याचे काम देखील चाले. बिडी कारखानदार आणि कंत्राटदार अशा लोकांची पिळवणूक करत असत. बाबू हरदास यांनी त्यांची संघटना उभी करून त्यांना त्यांच्या हक्काचा पैसा मिळवून दिला," असे न्या. घोरपडे सांगतात.




जय भिम का म्हटलं जातं?


बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांच्या नावाचे लघुरूप घेऊन त्यांच्या नावाचा जयजयकार करण्याची पद्धत सुरुवातीला महाराष्ट्रात रूढ झाली आणि हळुहळू जय भीम संपूर्ण भारतात म्हटलं जाऊ लागलं असं खासदार डॉ. नरेंद्र जाधव म्हणतात.



त्यांनी अनुसूचित जाती-जमातीतील लोकांमध्ये स्वयंभाव जागवला, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आणि मार्ग दिला. त्यांच्या प्रथम नावाचे लघुरूप करून त्यांचा जयघोष करणे, त्या भीमाचा जयघोष करणे क्रमप्राप्त आहे," डॉ.




जय भिम 



Omraj Waghmare

Hello Friends I am Omraj waghmare from Aurangabad, Maharashtra Most Welcome to yours omyablog.spot We are sharing updated current affairs,Exam related Mcq's, study material Healthy tips Etc.

Post a Comment

Previous Post Next Post